तर गाडीखालची कुत्रीही जोरात भुंकतील…
नानाची टांग
सह्याद्रीचा छावा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही.. पण गनिमांच्या फितुरीला कधी फरकच पडला नाही..वर्षानुवर्षे फितुरीच्या फैरी झडत राहील्या, झडत राहतील…पण वाटले नव्हते,गाडीखालची कुत्री एक दिवस मालकावरच भुंकतील..!
देश एकसंघ,पण प्रत्येकाला राज्याचा अभिमान असतो…महाराष्ट्र धर्म वाढविण्या,आम्ही आम्हालाच नावे ठेवतो..कोणाच्या ओंजळीतले पाणी पितो, न ठावे आम्हा.. कोणातरी परप्रांतियांच्या भुंकण्याला आम्ही छान म्हणतो..
अरे, हातच्या कंगनाला आरसा कशाला? त्यावर तर अफूचा अंमल चालतो.. परके येऊन खिजवतात आम्हाला!! आम्ही मात्र गर्दुल्यांना डोक्यावर मिरवतो..
मराठ्यांच्या आरक्षणावरून म्हणे अनेकांना कळवळा आहे…कोण म्हणतो सरकार पाठीशी, कोणाला पित्ताचा उमाळा आहे..
वकील म्हणतो, मला रोखले, दुसरा म्हणतो मांडलेच नाही.. तुमच्या श्रेयात आमच्या पोरांना, आधार आता उरला नाही..
राजकारण्यांनी रोखल्याचे वकीलसुध्दा सांगत राहतो.. तरीदेखील आम्ही राजकारण्यांना डोक्यावरच घेतो.. बाप सांगून थकला तरी, फुक्यांचे आम्ही श्राध्द घालतो..
लक्षात ठेवा पोरांनो, म्हातारी मेलीच आहे…पण काळही आता सोकवेल… बदनामीचं काहूर तुमच्या बापापर्यंत पोचेल..महापुरूषांची बदनामी, अन संस्काराचाही केला कचरा.. देशभक्तीच्या नावाखाली आता बापाचेही योगदान पुसतील.. अन आता गाडीखालची कुत्री देखील मालकावर भुंकतील..!
म्हणून वेळीच व्हा सावध… रात्र वैऱ्याची होऊन जाईल… गाडीखालच्या कुत्र्यांना वेळीच ठेचा..वेळ निघून जाईल..सह्याद्रीचा छावा ना झुकला, ना झुकणार आहे…असाच द्या संदेश,आता महाराष्ट्र गर्वाने बोलणार आहे…!!