एक गावठी पिस्टल अग्निशस्त्र व तीन जिवंत काडतुस बाळगणारा आरोपी जेरबंद
बारामती तालुका पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरूच

एक गावठी पिस्टल अग्निशस्त्र व तीन जिवंत काडतुस बाळगणारा आरोपी जेरबंद
बारामती तालुका पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरूच
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इसम नामे गणेश काशिद राहणार मेडद तालुका बारामती यांच्याकडे देशी बनावटीचा गावठी पिस्तूल आहे अशी माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे व त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.
त्याप्रमाणे साहयक पोलीस निरीक्षक लंगोटे व त्यांच्या पथकाने दोन दिवस रात्र गणेश काशिद यांच्यावर वेशांतर करून पाळत ठेवली.तो मेडद गावातील भैरवनाथ पेट्रोल पम्पासमोरील मेडद तालुका बारामती येथे आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले असता तो पोलीस पथक असल्याची चाहूल लागताच पोळून जाऊलागला मग त्याचा पाठलाग करून पोलीस पथकाने त्याला पाकडून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजूला एक गावठी बनावटीची पिस्तूल व अग्निशस्त्र मिळाले .त्यांच्याकडे परवान्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले त्यामुळे त्याच्यावर बारामती तालुका पोलिस स्टेशन कलम.६२८/२०२०भारतीय तालुका पोलिस स्टेशन कलम.६२८/२०२०भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५)सह२७अन्वये गुन्हा नोंद करून त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे .सदरची कारवाई श्री अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामिण,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमिलिंद मोहिते,उपविभागीय अधीक्षक श्री नारायण शिरगावकर,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे सहाय्यक फौजदार दिलीप सोनवणेपोलिस कॉन्स्टेबल नंदू जाधव ,विनोद लोखंडे ,गणेश कांबळे ,प्रशांत राऊत,संतोष मखरे यांनी ही कामगिरी केली.