इंदापूर

इंदापूर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई

चिंकारा हरणासह एकाला घेतले ताब्यात.

इंदापूर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई

चिंकारा हरणासह एकाला घेतले ताब्यात.

बारामती वार्तापत्र
इंदापूर शहरातील सरस्वती नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या परमेश्वर काळे या इसमाने त्याच्या राहत्या घरी दोन ते अडीच वर्षाचे चिंकारा हरण बाळगल्याप्रकरणी गुन्हे शोध पथकाने त्याला अटक केली असून चिंकारा हरणास वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विशाल चौधर, काकासाहेब पाटोळे,विक्रम जाधव, तसेच होमगार्ड गुंजले, होमगार्ड जाधव यांनी आरोपीच्या घरी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पुढील तपास उप वनसंरक्षक पुणे वन विभाग राहुल पाटील, सहाय्यक वनरक्षक राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button