स्थानिक

बारामतीत आढळला इंडियन स्पेक्टीकल कोब्रा

या नागाचे वय अंदाजे एक वर्ष आहे व लांबी अडीच फूट आहे.

बारामतीत आढळला इंडियन स्पेक्टीकल कोब्रा

या नागाचे वय अंदाजे एक वर्ष आहे व लांबी अडीच फूट आहे.

बारामती वार्तापत्र
बारामतीत आज इंडियन्स स्पेक्टीकल कोब्रा हा दुर्मिळ नाग सापडला आहे. त्यामुळे या नागा विषयी कुतूहल निर्माण झाले आहे.आज बारामती एमआयडीसी येथील वंजारवाडी, चौधरवस्ती येथे एका घराच्या कंपाऊंडमध्ये हा नाग सापडला

घरासमोरील पेवर ब्लॉक शेजारी साप निघाला म्हणून सर्पमित्र आदित्य पारखे व अक्षद शहा यांना बोलविण्यात आले. त्यावेळी आदित्य पारखे हे साप पकडण्यासाठी गेले असता त्यांना हा दुर्मिळ इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असल्याचे दिसले. हा साप अत्यंत दुर्मिळ असून याच्या फणीवर पांढऱ्या आकाराचा हुडमार्क आहे. साधारण नागाला मोडी लिपीतील दहाचा आकडा हा काळ्या कलर मध्ये असतो. मात्र या नागास इंग्रजी व्ही आकाराचा मार्क आहे.

या नागाचे वय अंदाजे एक वर्ष आहे व लांबी अडीच फूट आहे.हा नाग पकडल्यानंतर वन विभागाच्या हद्दीत सोडण्यात आला आहे.

सर्पमित्र आदित्य पारखे
नागरिकांनी साप निघाला तर न घाबरता सर्पमित्रांना फोन करावा. सध्या सापांचा मेटिंग पिरेड चालू आहे. त्यामुळे विषारी साप बाहेर निघत आहेत. साप हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्याला मारू नये.
आदित्य पारखे 83 90 10 78 81

Related Articles

Back to top button