पुणे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्यामुळे वारकऱ्यांना यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागण्याची शक्यता ?

राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्यामुळे वारकऱ्यांना यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागण्याची शक्यता ?

राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे.

बारामती वार्तापत्र

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यामुळे वारकऱ्यांना यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता आषाढी वारीवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षी वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरीला जातात. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे आषाढीवारी रद्द झाली होती. यंदाच्या पायी वारीसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेणार आहेत.

त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई आणि पुणे या शहरी भागांतील कोरोना नियंत्रणात असला तरी ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D