कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल चालकावर इंदापूर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
सरडेवाडी येथील दोघांवर केली कारवाई

कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल चालकावर इंदापूर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
सरडेवाडी येथील दोघांवर केली कारवाई
इंदापूर : प्रतिनिधी
दि.२७ रोजी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व पोलीस हवालदार दीपक पालके असे विभागीय रात्री गस्त घालत असताना सरडेवाडी येथील हॉटेल चालक व टी स्टॉल चालक अशा दोघांनी कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने इंदापूर पोलिसांनी दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार दीपक पालके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,शासनाने कोविड-१९ विषयक जे निर्बंध घातले आहेत त्या आदेशाचे उल्लंघन करून सरडेवाडी टोलनाक्या नजीक असणाऱ्या हॉटेल माऊली व लगत असणारा टी स्टॉल नियमापेक्षा जास्त वेळ चालू ठेवून तोंडाला मुखपट्टी ( मास्क ) न बांधता खाद्यपदार्थ तयार करून ते विक्री करत असताना आढळून आल्याने बाळू शेषराव ढगे ( वय २१ ) राहणार सरडेवाडी,ता,इंदापूर व विनोद सुभाष पुरुमवर ( वय ३० ) राहणार सरडेवाडी,ता.इंदापूर (मूळ पत्ता देगलूर,जि. नांदेड) या दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर २६३/२०२१ व २६४/२०२१ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (डब्लू) एक्स , सह भादंवि कलम १८८ , २६९ , २७० अन्वये गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी व व्यवसायिकांनी शासनाने निर्धारित केलेल्या वेळेतच हॉटेल तसेच इतर आस्थापना सुरू ठेवाव्यात जे कोणी नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सूचना व नम्र आव्हान इंदापूर पोलिसांनी केले आहे.
महत्त्वाचे निर्बंध व दंडात्मक तरतूद खालीलप्रमाणे
१. रात्रीची जमावबंदी
रात्री ८ ते सकाळी ७ वाजे पर्यत
५ पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास प्रत्येकी रू १०००/- दंड.
२. रात्री ८ ते सकाळी ७ सर्व सार्वजनिक आस्थापना आणि जागा बंद राहतील तसेच सर्व हॉटेल, मॉल्स, प्रेक्षागृह, दुकाने रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. रात्री ८ नंतर , पार्सल सेवेला परवानगी असेल.
३. मास्क न घालणे रू ५००/- दंड.
४. सार्वजनोक ठिकाणी थुंकणे
रू १०००/- दंड.
५. सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेत covid-१९ चे नियम न पाळणे रू.५०० दंड.
६. विवाहासाठी ५० ची परवाणगी मात्र
५० पेक्षा अधिक लोक असल्यास संबधित मालमत्ता कोवीड ची साथ संपेपर्यंत सीलबंद केली जाईल.
७. अंत्यविधीसाठी २० लोकांची परवानगी.
८. कोणतीही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम यांना परवानगी नाही.