देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांचे अजित पवार भाषण नाही! हा महाराष्ट्राचा अपमान- – सुप्रिया सुळे
भाषणाला दिल्लीतूनच परवानगी दिली नाही
देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांचे अजित पवार भाषण नाही! हा महाराष्ट्राचा अपमान- – सुप्रिया सुळे
भाषणाला दिल्लीतूनच परवानगी दिली नाही
अमरावती –प्रतिनिधी
देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नाही. यावरून वादाला तोंड फुटलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला नाकारले जाते ही अतिशय दुर्दैवी बाब असून हा प्रकार महाराष्ट्राचा अपमान करणारा आहे, टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केली.
प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.
पालकमंत्री या नात्याने अजित पवारांनी केले पंतप्रधानांचे स्वागत – देशाचे पंतप्रधान आपल्या मतदारसंघात येत असल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. देहू येथे आयोजित सोहळ्यात पंतप्रधान सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषणही होणार होते. या सोहळ्यात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होणे अपेक्षित असताना पंतप्रधान कार्यालयाकडून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाषण रद्द केले जाते आणि विरोधी विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाला परवानगी मिळते ही संतापजनक बाब असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.”
भाषणाला दिल्लीतूनच परवानगी दिली नाही – देहू संस्थान
या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना देहूच्या मंदिर संस्थांनचे प्रमुख नितीन महाराज मोरे म्हणाले, “हा आमचा धार्मिक कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींना मुंबईत संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यानुसार व्यासपीठावरील प्रोटोकॉल आम्हाला दिल्लीवरुन आले होते. त्यामध्ये संस्थानचा संबंध येत नाही. संस्थाननं हा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी घेतला होता”.
पंतप्रधानांनी दादांना भाषण करायची विनंती केली पण…
देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वत: पंतप्रधानांनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला असं भाजप महाराष्ट्राने म्हटलं आहे.