शैक्षणिक

शिवनगर अभियांत्रिकी महाविद्यालयाने दाखवली सामाजिक बांधिलकी – विद्यार्थी अपघाती विम्याचा लाभ

अपघातानंतर उपचाराचा ताण येऊ नये

शिवनगर अभियांत्रिकी महाविद्यालयाने दाखवली सामाजिक बांधिलकी – विद्यार्थी अपघाती विम्याचा लाभ

अपघातानंतर उपचाराचा ताण येऊ नये

बारामती वार्तापत्र

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणासोबतच त्यांची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची आहे.

विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि शिक्षक यांनाही अपघाताच्या संकटातून तातडीने मदत मिळावी या उद्देशाने शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यासह त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी वार्षिक ₹३,००,०००/- चा अपघाती विमा मोफत उपलब्ध करून दिला जातो. संस्थेने सदरील विमा योजना *चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स* कंपनीमार्फत राबवली आहे आणि संस्थेच्या वतीने संपूर्ण हफ्ता भरला जातो.

या सामाजिक बांधिलकीचा मोठा फायदा यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी कु. लडकत धनेश गोविंद याला मिळाला.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर रुपये १,००,०००/- चा विमा दावा मंजूर झाला असून, संस्थेच्या वतीने सदर रकमेचा धनादेश विद्यार्थ्याच्या वडिलांकडे संस्थेचे विश्वस्त मा. श्री. अनिलदादा जगताप, मा. श्री. रविंद्रदादा थोरात, सचिव डॉ. धनंजय ठोंबरे आणि प्राचार्य डॉ. शैलेंद्रकुमार मुकणे यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला.

हा अपघाती विमा केवळ अपघातानंतर आर्थिक मदतीसाठीच नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये तातडीच्या उपचारांसाठी देखील उपयोगी ठरतो.

अपघातानंतर उपचाराचा ताण येऊ नये आणि विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षक यांना सुरक्षिततेची खात्री मिळावी यासाठी महाविद्यालयाने हा महत्त्वाचा सामाजिक उपक्रम राबवला आहे. शिवनगर अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत असून, पालकांना त्यांचा पाल्य सुरक्षित असल्याची खात्री मिळते. या योजनेंतर्गत कोणत्याही अपघाताच्या परिस्थितीत दवाखान्यातील तातडीच्या उपचारासाठी विम्याचा लाभ घेता येतो.

याप्रसंगी सचिव डॉ. धनंजय ठोंबरे आणि प्राचार्य डॉ. शैलेंद्रकुमार मुकणे यांनी सदरील विमा योजनेचा कोणत्याही आपत्कालीन अपघाती परिस्थितीमध्ये लाभ विद्यार्थ्यांसह पालकांनी व शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन केले.

यासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष श्री.केशवराव जगताप व संचालक मंडळ , विश्वस्त श्री.वसंतराव तावरे ,श्री.अनिल जगताप , श्री. रवींद्र थोरात , श्री.महेंद्र तावरे , श्री.रामदास आटोळे , श्री.गणपत देवकाते व निमंत्रित सदस्या सौ.सीमा जाधव , सौ.चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!