स्थानिक

बारामती तालुक्यातील पणदरे येथे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास?; पोलिसांकडून तपास सुरू

सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू

बारामती तालुक्यातील पणदरे येथे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास?; पोलिसांकडून तपास सुरू

सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील पणदरे गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, चोरीस गेलेल्या रकमेबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू केली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चोरीमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके कामाला लावली आहेत. आरोपींनी चोरी कशा पद्धतीने केली, याचाही तपास सुरू आहे.

या धाडसी चोरीमुळे पणदरे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीस गेलेल्या रकमेबाबत आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button