स्थानिक

जरांगेंच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून बारामतीत ओबीसी समाजाची पोलिसांकडे धाव

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जरांगेंच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून बारामतीत ओबीसी समाजाची पोलिसांकडे धाव

मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बारामती वार्तापत्र

मनोज जरांगे यांच्या कथित आक्षेपार्ह व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात बारामतीतील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. संबंधित वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजाचे नेते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कथितरित्या अर्वाच्च व अपमानास्पद वक्तव्ये केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या वक्तव्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका तक्रारदारांनी मांडली आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट तसेच भाषणांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तपासामध्ये कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास मनोज जरांगे यांच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही बारामतीतील ओबीसी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Back to top button