स्थानिक

नायलॉन मांज्याला बारामती पोलिसांचा ‘ब्रेक’; विक्री-वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

दुचाकीस्वारांसह पक्ष्यांच्या जीवाला धोका 

नायलॉन मांज्याला बारामती पोलिसांचा ‘ब्रेक’; विक्री-वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

दुचाकीस्वारांसह पक्ष्यांच्या जीवाला धोका

बारामती वार्तापत्र 

पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन चायनीज मांजा नागरिकांसह पक्ष्यांसाठीही धोकादायक ठरत असून, या मांज्यामुळे गंभीर अपघात घडण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती पोलिसांनी नायलॉन चायनीज मांजाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

बारामतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी नागरिकांना आवाहन करत नायलॉन चायनीज मांजा तसेच जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याची विक्री, साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

या धोकादायक मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्ष्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा मांज्याचा वापर पूर्णपणे टाळावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच शहरात किंवा परिसरात नायलॉन चायनीज मांज्याची विक्री अथवा साठवणूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बारामती पोलीस सतर्क असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Back to top button