स्थानिक

‘दादांनी त्या दिवशी विमान घेतलं नसतं तर…’; अजितदादांची आठवण काढताना जय पवार भावुक

नाना पाटेकर गेले, दादाही नाहीत… एकापाठोपाठ एक चांगली माणसं गमावतोय

‘दादांनी त्या दिवशी विमान घेतलं नसतं तर…’; अजितदादांची आठवण काढताना जय पवार भावुक

नाना पाटेकर गेले, दादाही नाहीत… एकापाठोपाठ एक चांगली माणसं गमावतोय

बारामती वार्तापत्र 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार भावुक झाले. नाना पाटेकर आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध, त्यांच्या भेटीगाठी आणि जुन्या आठवणींचे व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आल्यानंतर जय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाना पाटेकर आणि अजितदादा पवार यांचे संबंध केवळ परिचयापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्यात आत्मीयतेचे नाते होते, अशी आठवण जय पवार यांनी सांगितली. “नाना आणि दादांचे संबंध किती जवळचे होते, हे आज पुन्हा समोर येणाऱ्या व्हिडीओमधून जाणवत आहे. नाना आपल्याला सोडून गेले आणि दादाही आज आपल्यात नाहीत. एकापाठोपाठ एक चांगली माणसं आपल्यातून निघून जाताना पाहणं खूप वेदनादायक आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘वेळ कुणाच्या हातात नसतो…’

या प्रसंगातून आपल्या माणसांना वेळ देण्याचा आणि नाती जपण्याचा महत्त्वाचा संदेश मिळतो, असेही जय पवार यांनी सांगितले.

“आपण कायम उद्याचा विचार करत राहतो. पण खरं सांगायचं तर वेळ कुणाच्या हातात नसतो. कुणाकडे थोडा जास्त असतो, कुणाकडे कमी. त्यामुळे आपल्या माणसांसोबत वेळ घालवला पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि मनातलं सांगितलं पाहिजे,” असे जय पवार म्हणाले.

अजितदादांच्या आठवणीने जय पवार भावुक

अजितदादा पवार यांच्या शेवटच्या प्रवासाची आठवण सांगताना जय पवार काही क्षण भावुक झाले. “आजही मनात एक विचार येतो… दादांनी त्या दिवशी विमान घेतलं नसतं तर कदाचित ते आज आपल्यात असते. पण शेवटी नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात,” असे त्यांनी सांगितले.

नाना पाटेकर आणि अजितदादा पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना जय पवार यांनी नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींनी मन हेलावून गेले असल्याचे सांगत त्यांनी आपल्या माणसांसाठी आजचा क्षण जगण्याचा आणि नाती जपण्याचा संदेश दिला.

Back to top button