बारामतीत अमावस्येनिमित्त भक्तीचा जागर! तांदुळवाडीत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात ‘जागरण सोहळा’
ह.भ.प. महेंद्र महाराज पिंगळे यांची कीर्तनसेवा

बारामतीत अमावस्येनिमित्त भक्तीचा जागर! तांदुळवाडीत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात ‘जागरण सोहळा’
ह.भ.प. महेंद्र महाराज पिंगळे यांची कीर्तनसेवा
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथे अमावस्येनिमित्त भव्य ‘जागरण सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, तांदुळवाडी येथे हा धार्मिक सोहळा होणार आहे.
या सोहळ्यात बालूमामा चरित्रकार ह.भ.प. महेंद्र महाराज पिंगळे (शिरसणे) यांची विशेष कीर्तनसेवा होणार असून, त्यांच्या कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक व भक्तिमय विचारांचे श्रवण करता येणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री भैरवनाथ प्रतिष्ठाण तांदुळवाडी, श्री भैरवनाथ उत्सव कमिटी ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ तांदुळवाडी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी वासकर सांप्रदाय भजनी मंडळ, तांदुळवाडी, जय हनुमान भजनी मंडळ, दादा पाटील नगर तसेच भक्ती नाथ भजनी मंडळ, श्रीनगर तांदुळवाडी यांचे सहकार्य लाभणार आहे.
अमावस्येनिमित्त आयोजित या जागरण सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भैरवनाथाच्या दर्शनासह कीर्तनसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
स्थळ : श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, मु.पो. तांदुळवाडी, ता. बारामती, जि. पुणे.






