क्राईम रिपोर्ट

दुहेरी हत्याकांडाने बारामती तालुक्यातील शेरेवाडी हादरली; युगेंद्र पवारांकडून नातेवाईकांची भेट

घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण

दुहेरी हत्याकांडाने बारामती तालुक्यातील शेरेवाडी हादरली; युगेंद्र पवारांकडून नातेवाईकांची भेट

घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण

बारामती वार्तापत्र 

  1. बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे मध्यरात्री दोन महिलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनेचे नेमके कारण काय, हत्येमागे कोणाचा हात आहे आणि आरोपी कोण आहेत, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी शेरेवाडी येथे जाऊन मृत महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नातेवाईकांशी संवाद साधत घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली. कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांनी त्यांच्या भावना आणि परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी घटनेचा तपास करणारे अधिकारीदेखील उपस्थित होते. त्यांनी युगेंद्र पवार यांना सुरू असलेल्या तपासाबाबत माहिती दिली. पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू असून, हत्येमागील कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, या दुहेरी हत्याकांडाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करून हत्येमागील नेमके कारण समोर आणावे, तसेच घटनेतील संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली.

शेरेवाडीतील या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरोपींचा शोध आणि हत्येचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
घटनेचा पुढील तपास बारामती पोलिसांकडून सुरू आहे.

Back to top button