राजकीय

बारामतीकरांनी आणखी एक रेकॉर्ड देशाला दिला…. सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया.

बारामतीकरांनी आणखी एक रेकॉर्ड देशाला दिला…. सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया….

सुनेत्रा पवार यांचा विजय भारतात एक रेकॉर्ड ठरला

बारामती वार्तापत्र

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दोन लाख 18 हजार 969 मताधिक्यानं विजय झालाय यानंतर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनेत्रा पवार यांचा विजय भारतात एक रेकॉर्ड ठरला आहे. बारामतीकरांनी अजून एक रेकॉर्ड आपल्या देशाला दिला आहे असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

मी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा अभिनंदन केल आहे. दादांचं काम इथे जास्त होतं.दादांना श्रद्धांजली म्हणून एवढ्या मोठ्या मताधिक्याने बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना निवडून दिल.एक श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांनी एवढं मोठ्या मतदान केलं आहे उद्या काय होईल हे आज आपल्याला सांगता येणार नाही असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

जो कोण चांगलं काम करेल ज्या पद्धतीने बारामतीकरांशी संवाद साधेल वेळ देईल बारामतीकर त्या व्यक्तीला निवडतील, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे

2029 साठी आणखीन तीन साडेतीन वर्षांचा काळ आहे सर्वांना त्यांचं कर्तुत्व सिद्ध करू दे. बारामतीकर खूप हुशार आहेत 2029 च्या निवडणुकीला ते ठरवतील असं अशी ही प्रतिक्रिया युगेंद्र केंद्र पवार यांनी दिली आहे.

Back to top button