बारामतीतील जनशक्ती कंत्राटी कामगार संघाची बैठक संपन्न
20 जून पर्यंत सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलनाची दिशा जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना जाहीर

बारामतीतील जनशक्ती कंत्राटी कामगार संघाची बैठक संपन्न
20 जून पर्यंत सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलनाची दिशा जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना जाहीर
बारामती वार्तापत्र
बारामती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारामती येथे जनशक्ती कंत्राटी कामगार संघ पदाधिकारी व सदस्यांची बैठक संपन्न झाली.कामगारांना पी.एफ., साप्ताहिक सुट्ट्या टेंडर येऊन तीन ते 4 वर्ष झाली तरी मिळाला नाही.
यासाठी आंदोलन,उपोषण संघाच्या वतीने करण्यात आली आहेत.नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ व नगरसेवक यांनी कामगारांना पगार वाढ करून दिली. तसेच नगराध्यक्ष सचिन सातव यांनी पी.एफ., साप्ताहिक सुट्टी देण्याचे आश्वासन दिले होते.
सदर आश्वासन आज पर्यंत पूर्ण झाले नाही.आम्ही पाठपूरावा केला परंतु सदर प्रश्न मार्गी लागला नाही.त्यांनी या महिन्यामध्ये फायनल करू असे सांगितले त्याचबरोबर कामगारांना पण आम्ही कामाबाबत नियम लावणार असे त्यांनी सांगितले होते.आम्ही तीन ते चार वर्षात कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही.
पी.एफ मिळालं नाही अगोदर मागण्या पूर्ण करा.असे यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बारामती नगरपरिषद मधील कंत्राटी कामगारांनी स्वच्छतेचे काम केलं नसतं तर बारामतीला पुरस्कार मिळाला असता का?
पुरस्कार मिळाला याचा अर्थ सर्वजण काम करत आहे.
राहिला विषय त्यांच्या हक्क अधिकाराचा त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागत आहे.येत्या 20 जून पर्यंत सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलनाची दिशा जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना जाहीर करणार आहे.
कामगारांवर अन्याय करायचा कोणीही प्रयत्न करू नये. अन्यथा त्याला पण कायदेशीर बाबीला सामोरे जावे लागणार आहे. याची नोंद घ्यावी.असे संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सदर बैठकीला बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे,सह संघटक ओम शिंदे, सरचिटणीस सुरज वाडेकर,बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात,महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर,महिला संघटक अलका बगाडे , महिला सरचिटणीस अनिता पवार,महिला सह कार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे पदाधिकारी, सदस्य संतोष भट,स्वप्निल लोंढे राहुल सोनवणे,विकास माने,प्रशांत शेलार ,नवनाथ धोत्रे,व कंत्राटी कामगार उपस्थित होते.






