क्राईम रिपोर्ट

बारामतीतील महिला हॉस्पिटलमधून पितळेचे पाण्याचे मीटर चोरीला; अंदाजे ३० ते ३५ हजारांचे नुकसान

हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

बारामतीतील महिला हॉस्पिटलमधून पितळेचे पाण्याचे मीटर चोरीला; अंदाजे ३० ते ३५ हजारांचे नुकसान

हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील महिला हॉस्पिटल परिसरातून पितळेचे पाण्याचे मीटर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरीला गेलेल्या मीटरची अंदाजे किंमत ३० ते ३५ हजार रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

हॉस्पिटल परिसरात बसविण्यात आलेले पितळेचे पाण्याचे मीटर अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी संबंधितांकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी चोरीच्या घटना वाढत असल्याने हॉस्पिटल परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी होत आहे.

Back to top button