स्थानिक

कऱ्हा नदी च्या छोट्या पुलाकडे कोणी पाहिल का??

बारामतीतील नागरिकांचा प्रश्न

कऱ्हा नदी च्या छोट्या पुलाकडे कोणी पाहिल का??

बारामतीतील नागरिकांचा प्रश्न

बारामती वार्तापत्र
बारामती शहराच्या सुशोभिकरणात भर टाकणाऱ्या बारामती शहर पोलीस स्टेशन च्या पाठीमागील भागात कऱ्हा नदीवरून मशिदी कडे व तेथून कसब्यात जाणारा छोटा पूल पडला आहे. त्या पुलाकडे कोणी पाहणार का? असा प्रश्न तेथील नागरिक करत आहेत.

कऱ्हा नदीला दोन वेळा मोठा पूर आला होता.त्यातील पहिल्या पुरामध्ये हा छोटा पूल वाहून गेला.त्यानंतर याची डागडुजी करण्यात आली. मात्र नंतरच्या आलेल्या पुरात हा पुल पुन्हा वाहून गेला. मात्र दोन अडीच महिने झाले तरी या पुलाची डागडुजी करण्यात कोणी पुढाकार घेत नसल्याचे दिसते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दर रविवारी शहरातील वेगवेगळ्या विकास कामांची व भविष्यात साकारणाऱ्या कामाची पाहणी करतात मात्र हा सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या पुलाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादां पर्यंत पोहोचला आहे कि नाही? बारामतीच्या स्थानिक समस्या दादांच्या कानावर घालणाऱ्या लोकांना याचा विसर पडला आहे काय? या पुलाच्या कामासाठी नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे पुढाकार घेणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

या पुलावरून हिंदु – मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिर व मज्जीद (मरकस )या दोन धार्मिक स्थळांना जोडणारा हा पूल आहे. हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिक नमाज व प्रार्थनेसाठी या पुलावरून जात-येत असतात. तसेच शहरातील इतरही नागरिक या मध्य मार्ग असणाऱ्या पुलाचा वापर कसब्यातील भागात जाण्यासाठी, शनी मंदिराकडे जाण्यासाठी, शहर पोलीस स्टेशन कडे जाण्यासाठी वापर करतात. त्यामुळे या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. अशी मागणी नागरिक करत आहेत.

Check Also
Close
Back to top button