बारामतीत भव्य मिरवणुकीत अण्णाभाऊंसह शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमांना अभिवादन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती बारामतीत मोठ्या उत्साहात साजरी

बारामतीत भव्य मिरवणुकीत अण्णाभाऊंसह शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमांना अभिवादन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती बारामतीत मोठ्या उत्साहात साजरी
बारामती वार्तापत्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त बारामती शहरात शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून नागरिक, युवक आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
मिरवणुकीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसह बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमांचाही समावेश करण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये रुजविण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीमुळे बारामती शहरात जयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला.







