स्थानिक

जिल्हा महासचिवपदी मंगलदास निकाळजे निवड

बारामतीत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असणारे आग्रही कार्यकर्ते आहेत.

जिल्हा महासचिवपदी मंगलदास निकाळजे निवड

बारामतीत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असणारे आग्रही कार्यकर्ते आहेत.

बारामती वार्तापत्र

बारामती येथील ब्ल्यू पॅंथर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले आग्रही युवानेते, आंबेडकरी चळवळीत चे क्रियाशील कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांची वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व विभागाच्या महासचिवपदी निवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी सदरील निवड पत्र देऊन प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.
श्री मंगलदास निकाळजे हे बारामतीत सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असणारे आग्रही कार्यकर्ते आहेत. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांसाठी आग्रही भूमिका घेऊन त्यांच्यावरील अन्याय अत्याचार जाब विचारण्यासाठी ते सतत आग्रही असतात. त्याच बरोबर अनेक विधायक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक कार्यक्रम व उपक्रमांचे ते आयोजन करीत असतात. चांगले संघटन कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे युवकांचे फार मोठे संघटन त्यांच्याबरोबर असते. श्री निकाळजे यांच्या निवडीबद्दल त्यांचे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also
Close
Back to top button