आपला जिल्हास्थानिक

बारामती तालुक्यात जिरायत भागात पाणी टंचाई, पंचायत समिती द्वारे टँकरने पाणी पुरवठा

12 गावे आणि तब्बल 54 वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

बारामती तालुक्यात जिरायत भागात पाणी टंचाई, पंचायत समिती द्वारे टँकरने पाणी पुरवठा

12 गावे आणि तब्बल 54 वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

बारामती वार्तापत्र

पुणे जिल्ह्यातील सुजलाम-सुफलाम आणि सदन भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यात यंदा उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असून, जिरायत पट्ट्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे बोरवेल, विंधन विहिरी, ओढे-नाले आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत पूर्णपणे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समितीने तातडीने उपाययोजना करत तालुक्यातील जिरायत भागातील 12 गावे आणि तब्बल 54 वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रशासनाकडून दररोज नियमित फेऱ्या मारत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. अनेक भागांमध्ये विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
विशेषतः जिरायत पट्ट्यातील गावांमध्ये शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होते. यंदा अपुऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून, महिलांना पाण्यासाठी लांब अंतर चालत जावे लागत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे. जनावरांसाठीही चाऱ्यासोबत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
बारामती पंचायत समिती प्रशासनाने उपलब्ध पाणीस्रोतांचा आढावा घेत टँकरचे नियोजन केले आहे.

Back to top button