आपला जिल्हा

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार

ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या न्याय मागण्या व प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार

ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या न्याय मागण्या व प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही

इंदापूर, आदित्य बोराटे –

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा पुणे यांच्या इंदापूर तालुका कार्यकारिणीची सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथील भाग्यश्री बंगल्यावर करण्यात आला.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी हे त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनातील महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांची भूमिका मोलाची असून ग्रामीण विकासाला अधिक गती देण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नूतन अध्यक्ष निलकंठ गिरी यांनी मनोगत व्यक्त करताना सहकाऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या न्याय्य मागण्या व प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

इंदापूर तालुका कार्यकारिणीमध्ये निलकंठ दत्तात्रय गिरी (अध्यक्ष), स्वप्नील माणिक गायकवाड (सचिव), विठ्ठल नामदेव मरगळ (उपाध्यक्ष), शैला गंगाराम आटोळे (महिला उपाध्यक्ष), दादासाहेब बाळकृष्ण वाघ (कार्याध्यक्ष), महादेव शंकर नगरे (कोषाध्यक्ष), रवींद्र आनंता शेलार (प्रसिद्धीप्रमुख) यांच्यासह अमोल प्रकाश भोसले, शोभा नारायण जाधव, अंबिका अरविंद पावसे, गणेश शिवाजी खरमाटे आणि राजेंद्र पांडुरंग काळे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.यावेळी ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Back to top button