मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवे निवासस्थान ‘शिवतीर्थ’मध्ये पाहुण्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी घेतली भेट

 राजकीय वर्तृळात भेटीची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवे निवासस्थान ‘शिवतीर्थ’मध्ये पाहुण्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी घेतली भेट

राजकीय वर्तृळात भेटीची चर्चा

प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपले नवे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थमध्ये गृहप्रवेश केला. तेव्हापासून  राज ठाकरेंच्या नव्या घरी पाहुण्यांच्या सदिच्छा भेटींचा सिलसिला सुरूच आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी  सुनेत्रा पवार यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भोजनाचा अस्वाद देखील घेतला. सुनेत्रा पवार यांचे राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 राजकीय वर्तृळात भेटीची चर्चा

राज्यामधील काही महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे. महापालिका निवडणुकींमध्ये मनसे भाजपासोबत युती करणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची अनेकदा भेट देखील झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता  राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button