
आजच्या आज तात्काळ ‘भारतीयांनो ‘… तातडीने कीव्ह सोडा,परिस्थिती आणखी चिघळणार?
व्हॅक्यमु बॉम्बला सर्वात मोठा बॉम्ब म्हणजेच फादर ऑफ ऑल बॉम्ब असंही म्हटलं जातं.
प्रतिनिधी
‘आजच कीव्ह सोडा’, भारतीय दूतावासाने सूचना दिल्या आहेत. कीव्हमधील भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी अलर्ट जारी केला आहे. भारतीय नागरिकांना आज कोणत्याही मार्गाने कीव्हमधून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे.
दूतावासाने यासंदर्भात सूचना देणारं ट्विट केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना कीवमधून निघून जाण्यास सांगण्यात आलं आहे. मंगळवारी दूतावासाने यासंदर्भात ट्विट केलं आहे.शक्यतो उपलब्ध गाड्यांद्वारे किंवा उपलब्ध इतर कोणत्याही वाहनांद्वारे तात्काळ कीव सोडा, असा सल्ला दूतावासाने दिला आहे. कीवमधील हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘कीवमधील भारतीयांसाठी सल्ला..
भारतीय दूतावासाने आपल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, ‘कीव्हमधील भारतीयांसाठी सल्ला.. विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तात्काळ कीव्ह सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आधीच उपलब्ध असलेल्या गाड्यांद्वारे किंवा इतर कोणत्याही उपलब्ध मार्गाने त्वरित हा देश सोडायला सांगितला आहे.







