मानसिक छळासाठी तक्रारीचा वापर” कर व प्रशासकीय अधिकाऱ्यावरील अदखलपात्र गुन्हा रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी बारामती नगरपरिषद कर्मचारी अधिकारी आक्रमक
कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप

मानसिक छळासाठी तक्रारीचा वापर”
कर व प्रशासकीय अधिकाऱ्यावरील अदखलपात्र गुन्हा रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
बारामती नगरपरिषद कर्मचारी अधिकारी आक्रमक!
कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेत कर व प्रशासकीय अधिकारी सचिन लक्ष्मण खोरे यांच्याविरोधात सोहेल गुलमहम्मद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आलेली अदखलपात्र गुन्हा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
यावेळी नगरपरिषद कर्मचारी यांनी दिलेल्या निवेदनामुळे नगरपरिषद प्रशासन आणि तक्रारदार यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याचे चित्र समोर आले आहे.
दिनांक २० जून २०२६ रोजी बारामती उपविभागीय पोलीस कार्यालयाला दिलेल्या निवेदनात नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, कर व प्रशासकीय अधिकारी सचिन खोरे यांच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
मात्र ही कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनानुसार, तक्रारदाराने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे आणि अधिकारी सचिन खोरे यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह भाषा वापरत बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचे म्हटले आहे.
यामुळे नगरपरिषदेच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असून प्रशासनाविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. यापुढे जाऊन, संबंधित एनसीआर ही वस्तुस्थिती मांडण्यासाठी नसून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
अशा तक्रारींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत असून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.निवेदनात शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया व सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी बंधनकारक असल्याचे सांगत पोलीस प्रशासनाने नियमांचे पालन केले नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
तसेच तक्रारदाराने खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. “खोट्या आणि द्वेषपूर्ण तक्रारींमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे.
अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित NCR रद्द करून तक्रारदारावर प्रतिबंधात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
——-
शासकीय कार्यालयात कामानिमित्त जाणे ही क्रम प्राप्त आहे. मात्र जर कोणी कोणत्याही करणास्थाव जाणे व्हिडिओ काढणे मोठ्याने बोलणे दडपण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे म्हणून गुन्हे दाखल करण्यात येतील. — श्री शैलय चिवडशेट्टी पोलिस निरीक्षक बारामती शहर पोलिस ठाणे
———-
नगरपरिषद अधिकारी सचिन खोरे यांच्या विरोधात दाखल एनसीआर दाखल झाला आहे. सदर घटना घडली नसताना विरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहे. सोशल मिडियावर दिशाभूल केली आहे म्हणून आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत आहोत. पंकज भुसे मुख्याधिकारी






