राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत दोन नवीन नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे भूमिपूजन नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते संपन्न

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत दोन नवीन नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे भूमिपूजन नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते संपन्न
सुमारे रु. २१.५२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत १५ व्या वित्त आयोगामधून मंजूर झालेल्या बारामती शहरातील दोन नवीन नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या (UHWC) उभारणीचा भूमिपूजन समारंभ नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते व मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या केंद्रांमुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या या आरोग्य केंद्रांच्या उभारणीसाठी प्रत्येकी सुमारे रु. २१.५२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
प्रभाग क्रमांक ९ मधील ढवाण वस्ती शाळा, खंडोबानगर तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील जळोची येथील सूर्यनगरी मंजूर ले-आऊट परिसरातील ओपन स्पेस येथे नव्या नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, आरोग्य समितीचे सभापती नवनाथ बल्लाळ, स्थानिक नगरसेवक विशाल हिंगणे, प्रवीण माने, नगरसेविका पूनम चव्हाण, रुपाली मलगुंडे, नगरसेवक अमर धुमाळ, अमोल कावळे, राजेंद्र सोनवणे, अल्ताफ सय्यद, नगरसेविका शर्मिला ढवाण, प्रतिभा खरात, आरती शेंडगे, अनुप्रिता ताबे-डांगे, मंगल किर्वे, सारिका वाघमारे, जिल्हा परिषद अभियंता योगेश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नाझिरकर, ज्योतिबा चव्हाण पाटील, नवनाथ मलगुंडे, फिरोज बागवान, अविनाश बांदल, अमोल वाघमारे, बारामती नगर परिषदेचे अधिकारी अक्षय नरे, सचिन खोरे, युवक अध्यक्ष अभिजित घाडगे, अनिता गायकवाड, प्रताप पागळे, आशा वर्कर्स तसेच कर्मचारी वृंद आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बारामती शहरातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. या नव्या आरोग्य वर्धिनी केंद्रांमुळे माता-बाल संगोपन, लसीकरण, विविध तपासण्या, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि प्राथमिक उपचारांच्या सुविधा नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणार असून शहराच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
■ चौकट ■
“स्वर्गीय अजितदादांचे स्वप्न आणि सुनेत्रावहिनींचे मार्गदर्शन लाभल्यामुळे बारामती शहरात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, ही स्वर्गीय अजितदादांची संकल्पना होती. मा. सुनेत्रावहिनी पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे हे प्रकल्प मंजूर झाले असून बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कायम कटिबद्ध राहील.”
— सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद.






