इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज अकोले,लाकडी व काझड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

विकास कामांकरिता १३ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज अकोले,लाकडी व काझड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

विकास कामांकरिता १३ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील मौजे अकोले, लाकडी व काझड येथे रविवारी (दि.१३) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १३ कोटी ६६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, पंचायत समिती सदस्य शितल वनवे, काझड चे सरपंच अजित पाटील, उपसरपंच राजू मोरे,लाकडी चे सरपंच द्रोपदा वणवे, उपसरपंच अनिल गायकवाड, अकोले चे सरपंच नकुशा दराडे, उपसरपंच संदीप दराडे हे असणार आहेत.

सदरील निधीतून अकोले येथील पुलाचे बांधकाम,लाकडी येथील रस्त्यांची कामे तसेच काझड येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर,कार्याध्यक्ष अतुल झगडे,सचिन खामगळ, हामा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच सायंकाळी ६ वाजता काझड या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

Check Also
Close
Back to top button