राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र!
यशाची उज्ज्वल परंपरा कायम

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र!
यशाची उज्ज्वल परंपरा कायम
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित इयत्ता ७ वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती येथील राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेजने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली आहे.
विद्यालयातील तब्बल २० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून संस्थेच्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
यामध्ये शौर्य जाधव यांनी २४४ गुण, काव्या भोंग यांनी २३० गुण, अनुष्का आटोळे यांनी २२६ गुण, स्वराली आडके यांनी २१८ गुण, तर श्रीनिवास गुट्टे यांनी २०६ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभाग प्रमुख विकास जाधव यांच्यासह सौ. मनीषा रुपनवर, सौ. पुनम गायकवाड, सौ. शुभांगी दिवेकर, सुधीर म्हेत्रे आणि श्री. निलेश गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. सतीश पाचपुते, पर्यवेक्षिका सौ. अलका चौधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच स्कूल कमिटीचे सदस्य श्री. सदाशिव (बापू) सातव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, आगामी काळातही विद्यार्थी अशाच प्रकारे यशाची नवनवीन शिखरे गाठतील, असा विश्वास संस्था प्रशासनाने व्यक्त केला आहे.







