शैक्षणिक

विद्याप्रतिष्ठाच्या व्हीपीकेबीआयईटी गुगल डेव्हलपर ग्रुप (जीडीजी) ऑन कॅम्पस तर्फे आयोजित “द जर्नी रॅप्ड – रिकॅप अँड रेकग्निशन” या भव्य समारोप सोहळ्याचे आयोजन उत्साहात संपन्न

सन्मान चिन्ह आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले

विद्याप्रतिष्ठाच्या व्हीपीकेबीआयईटी गुगल डेव्हलपर ग्रुप (जीडीजी) ऑन कॅम्पस तर्फे आयोजित “द जर्नी रॅप्ड – रिकॅप अँड रेकग्निशन” या भव्य समारोप सोहळ्याचे आयोजन उत्साहात संपन्न

सन्मान चिन्ह आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले

बारामती वार्तापत्र 

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, बारामती चॅप्टरचे सचिव भूषण धवन आणि आदेश वाडुजकर तसेच व्हीएस सॉफ्टवेअर लॅब्सचे सीईओ सचिन आटोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय संस्थेचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, डीन स्टुडंट अफेयर्स डॉ. गिरिधर नरोले, तसेच जीडीजी मेंटर व एचओडी एआय अँड डीएस डॉ. चैतन्य कुलकर्णी आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीडीजी ऑन कॅम्पसचे लीड आदित्य गुरव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करत हा समारोप सोहळा यशस्वीरीत्या पार पाडला.

मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांमधून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधींचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जीडीजीच्या २०२५-२६ मधील विविध उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला.

या कार्यक्रमात हॅकाथॉन, बूटकॅम्प्स आणि स्टडी जॅम्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके, सन्मान चिन्ह आणि आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला.

हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, बारामती चॅप्टर यांचे विशेष सहकार्य लाभले. एकूणच, जीडीजी ऑन कॅम्पसचा हा “द जर्नी रॅप्ड” समारोप कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या तांत्रिक प्रवासाला नवी दिशा देणारा ठरला.

Back to top button