स्थानिक

महिलांसाठी एक दिवस उपक्रम महत्वाचा: स्वाती ढवाण

विविध उपक्रमातून महिलांचा सन्मान

महिलांसाठी एक दिवस उपक्रम महत्वाचा: स्वाती ढवाण

विविध उपक्रमातून महिलांचा सन्मान

बारामती वार्तापत्र 

वर्षभर महिला गृहणी, नोकरी, व्यवसाय करत संसार उत्कृष्ट करत असतात त्यांना विरंगुळा मिळावा, त्यांच्या मधील विविध कौशल्य,कला यांना संधी मिळावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या साठी सत्कार व विविध खेळ असे पूर्ण दिवसभर कार्यक्रम चे आयोजन केले म्हणून’ एक दिवस महिलांचा उपक्रम’ महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पिंपळी लिमटेक च्या सरपंच स्वाती ढवाण यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यश मिळणाऱ्या महिला, मुलींचा सन्मान आणि महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी माय मिनिस्टर कार्यक्रम चे आयोजन व बक्षिस वितरण प्रसंगी पिंपळी लिमटेक च्या सरपंच स्वाती ढवाण बोलत होत्या.

या प्रसंगी बारामती नगरपरिषद च्या मा. नगरसेविका सुहासिनी सातव व शुभांगी सातव आणि ग्रामपंचायत पिंपळीच्या सदस्यां, मंगला केसकर, अश्विनी बनसोडे, मंगल खिलारे, निर्मला यादव, स्वाती पवार, वंदना पिसाळ व अंजना खोमणे, सुरेखा देवकाते, कल्पना बाबर, शारदा ढवाण, नीलिमा ढवाण, शोभा ढवाण, दिपाली ढवण, शुभांगी ढवाण, व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण अंबिका टेक्सटाईल पार्कच्या संचालिका रोहिणी आटोळे, गुळघर च्या संचालिका रोहिणी बोबडे आदी मान्यवर उपस्तीत होते .

चांडाळ चौकडीच्या करामती फेम अभिनेते रामभाऊ जगताप यांचा ‘ माय मिनिस्टर’ कार्यक्रमात प्रथम साक्षी खरात द्वितीय नलिनी सतीश गावडे, तृतीय अश्विनी निलेश बर्गे उत्तेजनार्थ रोहिणी अनंत काटे, पारुबाई खंडाळे यांनी बक्षिसे जिंकली.आभार दीपाली ढवाण यांनी मानले.

Related Articles

Back to top button