दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन; कार्यातून प्रेरणा घेऊन समर्पित सेवा देण्याचे आवाहन
विकासाभिमुख विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनसेवेसाठी अधिक तत्परतेने कार्य करण्याचा निर्धार

बारामती वार्तापत्र
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक, उपअधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी तसेच डॉक्टर, कर्मचारी आणि अन्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अंजली पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजाभिमुख, गुणवत्तापूर्ण आणि लोककेंद्रित आरोग्य सेवा देण्यासाठी प्रत्येकाने समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या विकासाभिमुख विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनसेवेसाठी अधिक तत्परतेने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.