क्राईम रिपोर्ट

बारामतीतील रेल्वे पुलाखाली नवजात बालिका सापडली; अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा

डायल ११२ वरून पोलिसांना माहिती

बारामतीतील रेल्वे पुलाखाली नवजात बालिका सापडली; अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा

डायल ११२ वरून पोलिसांना माहिती

बारामती वार्तापत्र 

तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर रेल्वे पुलाखाली नवजात बालिका जिवंत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. जन्मानंतर अर्भकाचा त्याग केल्याप्रकरणी अज्ञात आई-वडिलांसह जबाबदार व्यक्तींविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी शाहरुख शकील शेख (वय २६) यांनी फिर्याद दिली.

बुधवारी (१९) सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे पुलाखाली नवजात बालिका रडत असल्याची माहिती डायल ११२ वरून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता राधेश्याम चंद्रकांत जगताप (रा. शारदानगर, बारामती) हे अर्भकाला घेऊन उभे असल्याचे आढळले.

सकाळी दूध घेण्यासाठी जात असताना पुलाखाली अर्भक दिसल्याने जीव वाचविण्यासाठी त्याने ते उचलल्याचे जगताप यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बालिकेला तत्काळ शासकीय महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अर्भकाची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींनी त्याचा त्याग करण्याच्या हेतूने सार्वजनिक ठिकाणी सोडून दिल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे तपास पोलिस हवालदार अमोल भोसले करीत आहेत.

Back to top button