किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार! गर्दी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
किराणा दुकाने आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार! गर्दी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
किराणा दुकाने आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामती वार्तापत्र
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं 15 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या काळात राज्यभरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमधून काही घटकांना सूट देण्यात आलीय. पण किराणा दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे किराणा दुकाने आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑक्सिजन निर्मितीबाबत महत्वाचा निर्णय
कोरोनारुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करावीत. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सचिवांनी जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत.
राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे, आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.