कोरोंना विशेष

बारामती च्या तुरुंगात सोशल डिस्टन्स का पालन होत नाही आवर्जून वाचा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पर्यंत 20 कैद्यांना जामीन मंजूर.

सर्व विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या बारामतीत मात्र कैद्यांच्या उपकरागृहात मात्र सोशल डिस्टन्स चे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

बारामती शहरातील गुन्हेगारांना ठेवण्यासाठीच्या उप कारागृहाची व्यवस्था व जागा ही अस्वच्छ आहे. त्यामुळे येथील प्रशासनाचा  ढिसाळ कारभार अधोरेखित झाला आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या आवारात असणाऱ्या उप कारागृहामध्ये सध्या ५० कैदी आहेत .मात्र, या उप कारागृहाची क्षमता २३ कैद्यांची  आहे. सध्याअसलेल्या कोरोना या संसर्गाच्या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  येथे कोणतीही उपाययोजना दिसत नाहीत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दक्षता घेताना प्रशासनाची हतबलता या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.कोरोनाने सर्वत्र पाय पसरले असतानाच कैद्यांना वैद्यकीय तपासणीला रुग्णालयात नेण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे कैद्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलीस बंदोबस्ताअभावी कैद्यांच्या जीविताशी खेळले जात असल्याची चर्चा आहे.बारामती शहराची लोकवस्ती वेगाने वाढत आहे बारामती शहरातील गुन्हेगारांना ठेवण्यासाठी असणाºया जेलची मयार्दा २३ कैद्यांची असताना सध्या जेल मध्ये दुप्पटीहुन अधिक  ५० कैदी आहेत. तसेच येथील जेल मध्ये बारामती शहर, बारामती तालुका,वडगाव पोलीस स्टेशन येथील कैदी बारामती मध्ये ठेवलेजातात. तसेच मॅजिस्ट्रेट कस्टडी मधील इंदापुर व दौंड येथील कैदी देखीलदेखील बारामती जेल मध्ये ठेवले जातात. सध्या येरवडा सब जेलचे २१ कैदीत्यांची तारीख असल्याने बारामती येथे आणले आहेत.हे कैदी गेल्या पाचमहिन्यांपासून येथेच आहेत. मात्र ,जेलमधील कैद्यांची संख्या जास्त आहे.
येथे गार्डमध्ये सॅनिटायजर ठेवले आहे. कैद्यांना तोंडाला बांधण्यासाठी मास्क दिले असल्याचे कारागृहाचे तुरुंगरक्षक मयुर खोमणे यांनीसांगितले.
नवीन आरोपीला जेलमध्ये टाकण्याआधी त्याची सरकारी दवाखान्यात वैद्यकीय तपासणी केली जाते.तसेच जेल मधील कैद्यांनादेखील इलाजासाठी सरकारी रुग्णालयात आणले जाते. मात्र परत जेलमध्ये घेऊनगेल्यावर त्यांचे निर्जंतुकीकरण केले जात नाही . बराकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कैदी असल्याने फिजिकल डिस्टन्स पाळले जात नाही. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या भीषण परिस्थितीत जर बाहेरून जाणाऱ्या कैद्याची कोरोनाची चाचणी करणे किंवा उपाययोजना करणे गरजेचे आहे.बारामती पोलीस स्टेशनमध्ये एकूण ५ बराक आहेत. पैकी १ महिलांसाठी राखीव तर ४ बराकीत ५० कैदी ठेवण्यात आले आहेत. येथे जागा कमी असल्याने सोशल डिस्टनस चे पालन होत नाही लॉक डाऊन जाहीर केल्या पासून 20 कैद्यांना जमीन मंजूर झाला आहे.
सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारी बारामती पोलीस व कैदी यांच्या राहण्याच्या बाबतीत पिछाडीवर कशी असा सवाल उपस्तीत केला जात आहे.

Related Articles

Back to top button