मोठी बातमी:मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील
एका आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करण्याच्या सूचना
मोठी बातमी:मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील
एका आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करण्याच्या सूचना
नवी दिल्ली,प्रतिनिधी
मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात मध्यप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य केला आहे.
आता मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं तसे आदेश दिले आहेत.
ओबीसींना 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेश पंचायत निवडणूक प्रकरण
मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेतन्यायालयाचे आदेश आहेत. हा आकडा 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
आठवड्याभरापूर्वीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय होता
आठवड्याभरापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. सरकारने 15 दिवसांत पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांची अधिसूचना जारी करावी, असे ही आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.