हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी दिपावली निमित्त नागरिकांची अलोट गर्दी !

इंदापूरात मान्यवरांची मंदियाळी! 

हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी दिपावली निमित्त नागरिकांची अलोट गर्दी !

-इंदापूरात मान्यवरांची मंदियाळी!

इंदापूर प्रतिनिधी –

इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांचे भाग्यश्री निवासस्थानी परंपरेनुसार दिपावली फराळ स्नेह कार्यक्रम हजारो नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये व उत्साही वातावरणात गुरुवारी (दि.31) संपन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देणेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी मंदियाळी पहावयास मिळाली.

हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील व कुटुंबीयांकडून प्रत्येक वर्षी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील जनतेशी कौटुंबिक नाते जपले आहे, याचा प्रत्यय भागश्री बंगल्यावर झालेल्या प्रचंड जनसागराच्या रूपाने दिसून आला.

याप्रसंगी तुतारीच्या मंगलमय आवाजाने वातावरण प्रफुल्लित झाले होते. यानिमित्ताने भाग्यश्री बंगलो परिसर हा राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर, सर्वधर्मीय नागरिक, हितचिंतक व महिला भगिनींच्या गर्दीने फुलून गेला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व आपले प्रेम, आशीर्वाद पाठीशी राहू द्या, अशी मनःपूर्वक विनंती केली. यावेळी हर्षवर्धन भाऊ पाटील, राजवर्धन पाटील यांनी जनतेच्या शुभेच्छाचा स्विकारल्या.

______________________________

फोटो:-इंदापूर येथे भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा देण्यासाठी झालेली अलोट गर्दी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram