बारामती नगरपालिका निवडणुक:या प्रभागातील निवडणूक पुढे?

बारामती नगरपालिका निवडणुक:या प्रभागातील निवडणूक पुढे?
बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन प्रभाग वगळून निवडणूक होणार
बारामती वार्तापत्र
सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणूकीच्या अनुषंगाने मा. जिल्हा न्यायालय बारामती येथे दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिका क्र. ०१/२०२५, ०२/२०२५, ०३/२०२५ मध्ये मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून प्रभाग क्र.१३, जागा-ब आणि प्रभाग क्र.१७, जागा-अ या जागांसाठी दि.२६/११/२०२५ रोजी नव्याने प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आलेली असून सदर दोन नामनिर्देशन पत्रांच्या बाबतीत पुढील प्रकियेविषयी (छाननी, उमेदवारी माघारी घेणे, इत्यादी) बाबत मा. राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यास्तव बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा प्रभाग क्र.१३, जागा-ब आणि प्रभाग क्र.१७, जागा-अ या जागांसाठी चा उर्वरित निवडणूक कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाकडील प्राप्त होणाऱ्या सुधारित आदेशाप्रमाणे राबविण्यात येईल.अशी माहिती प्राप्त झाली आहे.
सदर दोन जागा वगळून अध्यक्ष व इतर सर्व जागांसाठीचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार पार पडेल.त्यामुळे आता हे वरील दोन प्रभाग वगळून निवडणूक पार पडणार आहे






