क्राईम रिपोर्ट

बारामतीत जमिनीच्या वादातून खांडज येथील इसमावर कुऱ्हाडीने हल्ला!

परिसरात भीतीचे वातावरण

बारामतीत जमिनीच्या वादातून खांडज येथील इसमावर कुऱ्हाडीने हल्ला!

परिसरात भीतीचे वातावरण

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील खंडोबानगर परिसरात खांडज येथील जमिनीच्या वादातून झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला.या वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले असून आरोपींनी कुराडीने हल्ला केला.

या हल्ल्यात महेंद्र गायकवाड यांच्यावर जीवघेणा वार करण्यात आला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी महेंद्र गायकवाड यांना उपचारासाठी तातडीने बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.

सध्या तेथील डॉक्टरांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू असून त्यांच्यावर आवश्यक उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हल्लेखोर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. जमिनीच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Back to top button