धनगर आरक्षण ; देवा भाऊंना लाडक्या बहिणीने दाखवला बारामती मधून आरसा !
चेहऱ्यावर बुक्का लावून केला सरकारचा निषेध...

धनगर आरक्षण ; देवा भाऊंना लाडक्या बहिणीने दाखवला बारामती मधून आरसा !
चेहऱ्यावर बुक्का लावून केला सरकारचा निषेध…
बारामती वार्तापत्र
2014 ला पिवळ्या भंडाऱ्याच्या ताकदीवर सत्तेत आले परंतु फसवणूक करणाऱ्या राज्यकर्त्यांना बुक्का लावण्याचा काम इथून पुढे धनगर समाज करेल. असे म्हणत देवा भाऊंना लाडक्या बहिणीने दाखवला बारामती मधून आरसा !
धनगर अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी साठी आझाद मैदान, मुंबई येथे १६ मार्च २०२६ पासून चालू असलेल्या उपोषण आंदोलनास क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी पाठिंबा देत बारामती येथील शारदा प्रांगण मधून निषेध नोंदवला. बारामती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये दिलेले आश्वासन पाळावे. यासाठी धनगर कार्यकर्त्यांनी बारामतीतून फडणवीस यांना विचारले, क्या हुआ तेरा वादा ????
महाराष्ट्र शासनाने संविधानानुसार कलम 342 (1) नुसार धनगर जमातीला दुरुस्तीचा अध्यादेश काढून केंद्र सरकारला त्वरित पाठवावा व राज्यघटनेप्रमाणे संविधानाने लागू केलेले आरक्षण लागू करण्यासाठी तसे आदेश व शासन निर्णय सरकारने करावा. आणि केंद्र सरकारने त्वरित त्याची अंमलबजावणी करून एसटी प्रमाणपत्र द्यावे. असे मत क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले.
उपोषणकर्ते दिपक बो-हाडे यांच्या एस.टी.आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाचा नववा दिवस. राज्य व केंद्र सरकारने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा याचे परिणाम महाराष्ट्र शासनास भोगावे लागतील. असे परखड मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले.






