स्थानिक
बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी व्यापारी बैठकीचे आयोजन
संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत

बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी व्यापारी बैठकीचे आयोजन
संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यापारा संदर्भातील अडचणी, समस्या व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी व्यापारी बैठक आयोजित करण्यात येत आहे.
यानुसार शनिवार, दिनांक 28 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत राजस्थान वस्त्रदालन, श्री महावीर पथ, बारामती येथे महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळी व्यापाऱ्यांना त्यांच्या अडचणी मांडण्याची तसेच त्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तरी बारामती शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या व्यापारा संदर्भातील अडचणी मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. सुशीलकुमार सोमाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.






