स्थानिक

बारामतीत अवकाळी वादळी वाऱ्यासहा पावसाची हजेरी

काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या

बारामतीत अवकाळी वादळी वाऱ्यासहा पावसाची हजेरी

काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात आज अचानक वातावरणात मोठा बदल झाला असून, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.

बारामती आणि परिसरात अचानक आलेल्या या बदलामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहताना दिसले, तर काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

Back to top button