क्राईम रिपोर्ट

बारामतीत वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी?; डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी

डॉक्टर अद्याप मोकाट फिरत असल्याची माहिती समोर येत आहे.

बारामतीत वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी?; डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी

डॉक्टर अद्याप मोकाट फिरत असल्याची माहिती समोर येत आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात वैद्यकीय क्षेत्रात धक्कादायक प्रकार समोर आला असून एका वैद्यकीय अधिकाऱ्याला एका डॉक्टरकडून धमकी दिल्याची घटना चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

मात्र या कारवाईमुळे संतप्त झालेल्या डॉक्टरने अधिकाऱ्याला जाब विचारत दमदाटी केल्याचे समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “तू माझ्यावर गुन्हा का दाखल केला?” असा सवाल करत संबंधित डॉक्टरने वैद्यकीय अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे बारामतीतील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली असून डॉक्टरांमध्येही याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होऊनही संबंधित डॉक्टर अद्याप मोकाट फिरत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांमध्येही याबाबत नाराजी व्यक्त होत असून पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, अशा प्रकारे दंडेलशाही आणि गुंडगिरीला खतपाणी मिळत असेल, तर त्याचा परिणाम संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सत्य परिस्थिती उघड करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे बारामतीतील वैद्यकीय क्षेत्रातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Back to top button