सावधान पोलीस भरतीसाठी शक्तिवर्धक पेये घेणं पडलं महागात, दौंडमध्ये धावताना उमेदवाराची प्रकृती बिघडली; प्रसंगावधानाने वाचले प्राण.!
राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 येथे शस्त्र दल भरती प्रक्रिया सन 2025-2026 ही 16 मार्च पासून सुरू आहे.

सावधान पोलीस भरतीसाठी शक्तिवर्धक पेये घेणं पडलं महागात, दौंडमध्ये धावताना उमेदवाराची प्रकृती बिघडली; प्रसंगावधानाने वाचले प्राण.!
राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 येथे शस्त्र दल भरती प्रक्रिया सन 2025-2026 ही 16 मार्च पासून सुरू आहे.
दौंड;प्रतिनिधि
पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका उमेदवाराला शॉर्टकट वापरणे चांगलेच महागात पडले आहे. मैदानी चाचणीत जास्त गुण मिळवण्यासाठी ‘उत्तेजित पदार्थांचे’ सेवन केल्यामुळे या उमेदवाराची मानसिक स्थिती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार दौंड मधील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) मैदानावर घडला आहे.
संबंधित उमेदवाराने धावण्याच्या चाचणीत वेग वाढवण्यासाठी अंमली किंवा उत्तेजित पदार्थाचे सेवन केले होते. मात्र, धाव पूर्ण केल्यानंतर काही वेळातच या पदार्थाचा त्याच्या शरीरावर आणि थेट मेंदूवर विपरीत परिणाम झाला.
तो उमेदवार भरती प्रक्रियेदरम्यान विचित्र वर्तन करू लागला आणि त्याने मैदानात मोठा गोंधळ घातला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिथे तैनात असलेल्या SRPF च्या जवानांनी तत्काळ धाव घेतली. त्या उमेदवाराला वेळीच आवर घालून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांच्या उपचारानंतर सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते, मात्र या घटनेने भरती प्रक्रियेत खळबळ उडाली आहे ; दरम्यान याबाबत राज्य राखीव दलाचे सहायक समादेशक सचिन डहाळे यांनी सांगितले की, राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 येथे शस्त्र दल भरती प्रक्रिया सन 2025-2026 ही 16 मार्च पासून सुरू आहे.
2 एप्रिल रोजी तीन उमेदवारांनी उत्तेजीत पदार्थ आणि गोळ्यांचे सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे.





