स्थानिक

बारामतीत एक मे रोजी मराठा समाज्याचा वधू वर मेळावा

वेळ वाचावा पैसा वाचावा व खाजगी एजंट पासून फसवणूक होऊ न

बारामतीत एक मे रोजी मराठा समाज्याचा वधू वर मेळावा

वेळ वाचावा पैसा वाचावा व खाजगी एजंट पासून फसवणूक होऊ न

बारामती वार्तापत्र

अखिल भारतीय मराठा महासंघ, बारामती शाखा यांच्या वतीने शुक्रवार १ मे रोजी भव्य वधू-वर सूचक मेळावा २०२६चे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा समाजातील उपवर तरुण-तरुणींच्या विवाह नियोजनातील आव्हाने लक्षात घेऊन, त्यांना योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी व पालक,पाल्य यांचा वेळ वाचावा पैसा वाचावा व खाजगी एजंट पासून फसवणूक होऊ नये म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ, बारामती तर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये इंजिनिअर, नोकरदार, व्यावसायिक,परदेशी स्थायिक तसेच शेतकरी अशा सर्व स्तरांतील स्थळांचा समावेश असेल.

अविवाहित मुला-मुलींसोबतच विधवा, विधुर व घटस्फोटित वधू-वरांचे देखील या मेळाव्यात नावनोंदणी करून सहभागी होऊ शकतात.
बारामती शहरातील भिगवण रोड येथील जिजाऊ भवन येथे शुक्रवार, ०१ मे २०२६
सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.

९८२२४४९३०६ | ७८७५१२१९८९ | ९३८९७७११११ | ९४२३४९४९७७
व नोंदणीसाठी खालील लिंक चा वापर करावा https://forms.gle/rdrtuzAvs66Uasza8
तरी विवाह इच्छित नियोजित वधू वर व पालक यांनी सदर मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी माने व महिला अध्यक्ष अर्चना सातव यांनी केले आहे.

Back to top button