धक्कादायक! कलिंगड खाणे बेतले जीवावर अख्खं कुटुंब संपलं; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत
पोलिसांनी कुटुंबाने खाल्लेलं कलिंगड, तसेच त्यांच्या शरिरातील नमुने घेतले असून तपास सुरू केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

धक्कादायक! कलिंगड खाणे बेतले जीवावर अख्खं कुटुंब संपलं; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत
पोलिसांनी कुटुंबाने खाल्लेलं कलिंगड, तसेच त्यांच्या शरिरातील नमुने घेतले असून तपास सुरू केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बारामती वार्तापत्र
मुंबईतील पायधुनी परिसरात फूड पॉइझनिंगमुळे एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिर्याणीनंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे. कुटुंबाने खाल्लेल्या कलिंगडाचे नमुने, तसेच त्यांच्या शरिरातील नमुने घेण्यात आले असून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितलं.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुंबईत खळबळ
समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार अन्न विषबाधेचा (Food Poisoning) असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मृत्यू पावलेल्या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले होते, अशी माहिती समोर येत आहे.
अब्दुल्ला डोकाडिया (४०), नसरीन डोकाडिया (३५), आयेशा (१६) आणि झैनब (१३) अशी मृतांची नावे आहेत. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या चौघांचाही मृत्यू झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात कुटुंबातील एका सदस्याने नमूद केले होते की, मृत्यूपूर्वी त्यांनी रात्री बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नेमके जेवणातील कोणत्या पदार्थामुळे विषबाधा झाली, याचा तपास पोलीस करत आहेत. “शवविच्छेदन अहवाल (Post-mortem report) प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल,” असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






