आपला जिल्हा

बारामती एमआयडीसी मधील नामांकित कंपनीमध्ये अनेक नोकऱ्या उपलब्ध

आकर्षक पगार, कॅन्टीन व बस सुविधा देण्यात येणार आहे.

बारामती एमआयडीसी मधील नामांकित कंपनीमध्ये अनेक नोकऱ्या उपलब्ध

आकर्षक पगार, कॅन्टीन व बस सुविधा देण्यात येणार आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती एमआयडीसी मधील नामांकित कंपनीमध्ये युवकांसाठी अनेक नोकऱ्या उपलब्ध झाल्या असून बारामती परिसरातील युवकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.

१८ ते ३५ वयोगटातील १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा व बी.ई उत्तीर्ण उमेदवारांना नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या उमेदवारांना आकर्षक पगार, कॅन्टीन व बस सुविधा देण्यात येणार आहे. शासन नियमाप्रमाणे पी.एफ व इ.एस.आय.सी चा लाभ या उमेदवारांना मिळणार आहे. कार्यकुशल आणि प्रामाणिक उमेदवारांना तीन वर्षानंतर नोकरीत कायम होण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या कार्यालयातील 9067100455 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

बारामती एमआयडीसी मधील नामांकित कंपन्यांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असताना स्थानिक युवकांना प्राधान्याने संधी मिळवून देण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन प्रयत्नशील असलेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले. यासाठी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशहा शेख, कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, संभाजी माने, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, राजन नायर, सदाशिव पाटील, खंडूजी गायकवाड, अभिजीत शिंदे, हरीश कुंभारकर विशेष परिश्रम घेत असलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

Back to top button