शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीके बीआयईटी, बारामती येथे पोस्टर अँड प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट्सचे मूल्यमापन करून तांत्रिक मार्गदर्शन केले

विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीके बीआयईटी, बारामती येथे पोस्टर अँड प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट्सचे मूल्यमापन करून तांत्रिक मार्गदर्शन केले

बारामती वार्तापत्र 

दि. २८ एप्रिल २०0६ रोजी पोस्टर अँड प्रोजेक्ट प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सीएसआय अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, वेब डेव्हलपमेंट आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान विषयांवरील नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी,यांचे मार्गदर्शन लाभले.

समन्वयक म्हणून प्रा. निशा सोंनगिरे प्रा. बर्खा शाहाजी, प्रा. प्रियांका कोकरे आणि डॉ. पी. एन. जैस्वाल यांनी उत्कृष्ट नियोजन केले. स्पर्धेसाठी उद्योग क्षेत्रातील मान्यवर परीक्षक उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट्सचे मूल्यमापन करून तांत्रिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची कल्पकता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्ये यांचे उत्कृष्ट प्रदर्शन यावेळी पाहायला मिळाले.

स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र देण्यात आले तसेच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, संघभावना आणि व्यावहारिक शिक्षणाला चालना मिळाली. कार्यक्रमाचे प्राध्यापक, परीक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले.

Back to top button