बारामतीतील कदम अकॅडमीची निकालाची गौरवशाली परंपरा कायम
विद्यालयातील एकूण 165 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाली होते.

बारामतीतील कदम अकॅडमीची निकालाची गौरवशाली परंपरा कायम
विद्यालयातील एकूण 165 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाली होते.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या कदम अकॅडमी ने दहावीच्या बोर्ड परीक्षेत यंदाही शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादित केले आहे. विद्यालयातील एकूण 165 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाली होते.
या विद्यार्थ्यांपैकी एकूण 125 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.
अकॅडमी मध्ये प्रथम क्रमांक मयुरी हिवरे 96.20%, द्वितीय क्रमांक स्वराज ठोंबरे 95%, तृतीय क्रमांक ऐश्वर्या मोदी 94.80%, चतुर्थ क्रमांक शरयू गायकवाड, सृष्टी काटे स्नेहल यादव 94.60% यांनी विभागून मिळवला तर पाचवा क्रमांक तेजश्री जराड, समर्थ चव्हाण, वैष्णवी गवारे,ऋषिकेश कोकरे,श्रेयश गडदे 94.40% यांनी विभागून मिळवला. विद्यार्थ्यांच्या या निकालामुळे अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
अकॅडमीच्या या दैदीप्यमान निकालाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन अकॅडमीचे संचालक डॉ.सुविराज कदम, डॉ.साक्षी कदम, कल्पना कदम,जयसिंगराव कदम, प्रियांका वावगे, व्यवस्थापक संदेश राठोड, आदेश राठोड, अनिकेत भांड, सदस्य विशाल सातव, शिक्षक प्रमुख मोहन यादव, सुभाष गायकवाड, सुशांत क्षीरसागर, ज्योती शेटे यांनी केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणातून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी संधी
कदम अकॅडमी ही केवळ अकॅडमी नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारे संस्कार केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या समर्पणाचे,पालकांच्या विश्वासाचे फलित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आर्थिक प्रोत्साहन व सहकार्य मिळावे यासाठी शिष्यवृत्ती योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील.






