स्थानिक

बारामतीतील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईची मागणी

सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बारामतीतील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईची मागणी

सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बारामती वार्तापत्र 

शहरातील शासकीय कत्तलखान्यांमध्ये नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर जनावरांची कत्तल होत असल्याचा आरोप करत, हे कत्तलखाने तत्काळ सील करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे.

याबाबत मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पंकज भुसे यांना निवेदन दिले.
निवेदनानुसार, बारामतीत केवळ म्हैस वर्गीय जनावरांच्या कत्तलीस परवानगी असताना इतर जनावरांचीही मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे.

या कत्तलखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसून, प्राण्यांच्या वैद्यकीय तपासणीचीही कोणतीही नोंद नाही. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कऱ्हा नदीपात्रातील आठ कत्तलखाने यापूर्वी सील केले होते. मात्र, संबंधितांनी सील तोडून पुन्हा कत्तली सुरू केल्याचा दावा निवेदनात केला आहे. शेती उपयोगी जनावरांची कत्तल थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत सातव, ॲड. ज्ञानेश्वर माने, अक्षय देवकाते व अन्य गोरक्षकांनी केली आहे.

Back to top button