कृषिमंत्र्याच्या इंदापूर तालुक्यात खडकवासल्याच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक; पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
वारंवार निवेदने देऊनही शासन आणि संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही.

कृषिमंत्र्याच्या इंदापूर तालुक्यात खडकवासल्याच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक; पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
वारंवार निवेदने देऊनही शासन आणि संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही.
इंदापूर;प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खडकवासला धरणाच्या कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. कळस परिसरातील शेतकरी आज पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
डाळज येथे हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने शेतीपिके करपण्याची भीती निर्माण झाली असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत खडकवासला कालव्यातून नियोजनबद्ध पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे.
या रास्ता रोको आंदोलनामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.